मुंबई: मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं नंतर. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत महाराजांची तुलना करणं, हा काही चुकून आलेला शब्द नाही. हे पूर्णपणे नियोजित आहे. हे या सरकारचं आणि पक्षाचं नियोजन दिसतंय की, महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं.”
याचबरोबर “राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री आज बोलले आहेत. ही सगळी वस्तूस्थिती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? हा महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. हे मंत्री मुंबईची reality ओळखणारे नाहीत, तर मुंबईचीreality ओळखणारे आहेत. आवाज नक्की कोणाचा आहे हे नक्की ओळखून घ्या. पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झाला आहे”, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं. याशिवाय, “ करण्याची वेळ तरी का यावी. खरंतर याच खोके सरकारने त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं, पदमुक्त केलं पाहिजे होतं. अजुन कुठेही तशी प्रतिक्रिया एका सुद्धा मंत्र्याकडून आलेली नाही. उलट ते वक्तव्य झाकावं म्हणून वेगवेगळी वक्तव्य यावर होत आहेत. कदाचित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं वक्तव्य यांना वाचवण्यासाठीच असेल. दुसरी बाजू अशीदेखील असू शकते की जसं निवडणुकीच्या अगोदर गुजरातला उद्योग पळवले, तसं आमच्या महाराष्ट्रातून कर्नाटकाला गावं पळवतील. कारण आता निवडणूक तिकडची पण आलेली आहे. पण हे सगळं आपण जे बघतोय हे महाराष्ट्राचं खच्चीकरण व्हावं, आर्थिक अलगीकरण व्हावं, या दृष्टीकोनातून सगळं सुरू आहे. ” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर टीका केली.
must read