नवी दिल्ली – जामा मशीद (Jama masjid) येथे झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी काल रात्री याप्रकरणी दोघांना अटक केली. डीसीपी सेंट्रल डिस्ट्रिक्ट श्वेता चौहान यांच्या म्हणण्यानुसार, आता या प्रकरणात कलम 153A देखील जोडण्यात आले आहे. शुक्रवारी लोकांनी जामा मशिदीबाहेर भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि प्रेषितांवरील वादग्रस्त वक्तव्याबद्दल निष्कासित नेते नवीन जिंदाल (Naveen Jindal) यांच्या विरोधात निदर्शने केली.
शनिवारी याप्रकरणी भादंवि कलम 188 अन्वये अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी श्वेता चौहान यांनी याबाबत सांगितले होते की, लोकांनी हातात पोस्टर आणि बॅनर घेऊन जामा मशिदीबाहेर घोषणाबाजी केली. याच भागात ही कारवाई करण्यात आली.
दिल्लीतील जामा मशिदीबाहेर मुस्लिम समाजाच्या लोकांनी केलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मशिदीबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळपासून तेथे पोलिसांचा पहारा दिसत होता. विशेष म्हणजे, प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेवर शुक्रवारी जामा मशीद ते दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया कॅम्पसपर्यंत निदर्शने करण्यात आली. शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने केली आणि नुपूर शर्मा आणि इतरांच्या अटकेची मागणी केली. यावेळी जामा मशिदीबाहेर मोठी गर्दी दिसून आली, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
दुसरीकडे, जामा मशिदीच्या शाही इमामाने या निदर्शनाविषयी सांगितले होते की, आंदोलक कोण आहेत हे आम्हाला माहित नाही, मला वाटते की ते एआयएमआयएम किंवा ओवेसीचे लोक आहेत. ते म्हणाले की, त्यांना आंदोलन करायचे असेल तर ते करू शकतात, पण आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, असे आम्ही स्पष्ट केले आहे. दिल्लीच्या जामा मशिदीतच नव्हे तर सहारनपूर आणि लखनऊमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने झाली.