Poco X6 Neo : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण बाजारात आता Poco X6 Neo लाँच होणार आहे. विशेष म्हणजे कंपनी 5G फोनवर जबरदस्त ऑफर देत आहे. भाग्यवान ग्राहकांना 1.40 लाख रुपयांची बाईक 1 रुपयात मिळणार आहे.
मिळतील जबरदस्त फीचर्स
पोकोचा हा फोन पंच-होल स्क्रीनसह येत असून यात कंपनी स्क्रीन टू बॉडी रेशो 93.3% देत आहे. खूप कमी बेझल असणाऱ्या या फोनची जाडी 7.69mm असून कंपनीने पुष्टी केली आहे की ती या फोनमध्ये OLED डिस्प्ले देईल. कंपनीने शेअर केलेल्या टीझरनुसार, हा फोन 108-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासह येणार आहे. ही कंपनी फोन ब्लू आणि गोल्डनसह आणखी अनेक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करेल.
रिपोर्ट्सनुसार, हा फोन Redmi Note 13 Pro 5G चे रीब्रँडेड व्हर्जन असून जो कंपनीने मागील वर्षी चीनमध्ये लॉन्च केला होता. Poco च्या नवीन फोनमध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच फोनमध्ये ऑफर केलेल्या या डिस्प्लेमध्ये उच्च-रिफ्रेश दर असेल. प्रोसेसर म्हणून, कंपनी फोनमध्ये डायमेंशन 6080, डायमेंशन 810 ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती देईल.
कंपनी Redmi Note 13R Pro सारख्या 108 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 2 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा देण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी, Poco च्या नवीन फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी, कंपनी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देईल. यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर आणि 3.5mm हेडफोन जॅक दिसेल. फोनची बॅटरी 5000mAh असून ती 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.