Poco M5 : जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे जाणुन घ्या जबरदस्त फीचर्ससह येणारा स्मार्टफोन तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करु शकता.
याचा मुख्य कारण म्हणजे Poco ने आपला लोकप्रिय स्मार्टफोन Poco M5 च्या किमतीमधये मोठी कपात केली आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Poco M5 फीचर्स
Poco च्या या डिवाइस मध्ये ग्राहकांना 6.58 इंच फुल एचडी प्लस IPS डिस्प्ले मिळेल. जे 1,080×2,800 पिक्सेल रिझोल्यूशन प्रदान करते ज्यामध्ये तुम्हाला 90 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी याला गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
यासोबतच प्रोसेसरसाठी यात ऑक्टाकोर मीडियाटेक हेलिओ जी 99 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 6 GB LPDDR4X रॅम आणि 128 GB UFS 2.2 स्टोरेज मिळेल.
कॅमेर्याच्या कॉलिटीबद्दल बोलायचे झाले तर, यात तीन रियर कॅमेरे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची आहे. फ्रंटला सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
पॉवरसाठी, यात 5,000mAh ची पावरफुल बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये तुम्हाला Wi-Fi, Bluetooth, GPS सारखे फीचर्स देखील मिळतात.
Poco M5 ऑफर
त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. जे 51% च्या सवलतीनंतर 7,777 रुपयांना विकले जात आहे. बँक ऑफर अंतर्गत, तुमच्या ग्राहकांना Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक दिला जात आहे.
याशिवाय तुमचा जुना फोन बदलून तुम्ही 6,490 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळवू शकता. पण तुमच्या जुन्या फोनचे मॉडेल चांगले असावे.