मुंबई : सध्या स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर सवलतीत वेगवेगळे स्मार्टफोन विक्री होत आहेत. बरेच लोक बजेट स्मार्टफोनच्या शोधात असतात. बाजारात 8000 रुपयांच्या श्रेणीतील अनेक फोन आहेत. येथे आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर 8000 रुपयांपासून स्वस्त असलेल्या 3 उत्कृष्ट स्मार्टफोनबद्दल सांगत आहोत. यामध्ये 3 रियर कॅमेरे, 5000 mAh बॅटरी आणि 32 GB स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
POCO C31
8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तीन रियर कॅमेऱ्यांसह येणारा हा एक फोन आहे. त्याच्या 3 GB RAM + 32 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. वैशिष्ट्यांबद्दल सांगितले तर यामध्ये 6.53 इंच HD + डिस्प्ले, 13MP + 2MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे.
realme Narzo 50i
हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवरून 7,549 रुपयांना खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 2 GB RAM + 32 GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. वैशिष्ट्यांबद्दल सांगितले तर 6.5 इंच डिस्प्ले, 8MP रिअर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि SC9863A प्रोसेसर उपलब्ध आहेत.
Infinix Smart 5
या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. फोनच्या 2 GB RAM + 32 GB स्टोरेज प्रकाराची किंमत 7,499 रुपये आहे. फोनमध्ये तुम्हाला 6.82 इंच एचडी + डिस्प्ले, 13MP + लाइट सेन्सरसह रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.