PNB Bank: पीएनबी खातेधारकांनो 19 मार्चपर्यंत ‘हे’ काम करून घ्या नाहीतर होणार नुकसान

PNB Bank: जर तुम्ही देखील देशाच्या सर्वात मोठ्या बँकपैकी एक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्या मुख्य कारण म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन नियम तयार केला आहे.

या नियमानुसार तुम्हाला काही कामे 19 मार्चपर्यंत करावे लागणार आहे नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. चला मग जाणून घेऊया या नवीन नियम बद्दल सविस्तर माहिती PNB ने RBI च्या मार्गदर्शक तत्वांनुसार KYC अपडेट करणे अनिवार्य केले आहे, जे ग्राहक केवायसी करणार नाही त्यांचे अनेक कामे लटकण्याची शक्यता आहे.

जर तुमचे पीएनबीमध्ये खाते असेल आणि तुम्ही केवायसीचे काम केले नसेल, तर ते तुम्ही लवकरात लवकर करुन घ्या. कोणत्याही परिस्थितीत खातेदारांना हे काम 19 मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.

धो धो कोसळणार पाऊस, येणार वादळ, ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

कोणते खातेदार प्रभावित होतील ते जाणून घ्या

पंजाब नॅशनल बँक नुसार, 19 मार्चची अंतिम मुदत त्या खातेधारकांना लागू होईल ज्यांच्या खात्यांचे KYC 31 डिसेंबर 2023 पर्यंत अपडेट केलेले नव्हते. केवायसी अपडेट करण्यासाठी बँक आपल्या खातेदारांना सतत मेसेज पाठवत आहे. पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार बँकेच्या शाखेत जाऊन माहिती मिळवू शकतात, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.

यासोबत, केवायसी अपडेट करण्यासाठी, पीएनबी खातेधारकांना त्यांच्या शाखेत त्यांचा आयडी, पत्ता पुरावा, फोटो, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, मोबाइल नंबरची माहिती द्यावी लागेल. ग्राहक थेट शाखेला भेट देऊन किंवा PNB ॲप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे KYC अपडेट करू शकतात.

केवायसी अपडेट न केल्यास नुकसान होईल

जर तुम्ही PNB चे KYC अपडेट केले नाही तर तुमचे खाते ब्लॉक केले जाईल, ज्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. असं असलं तरी केवायसीबाबत रिझर्व्ह बँक खूप कडक आहे. केवायसी नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेक बँकांवर मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे.

महायुतीत ‘या’ 6 जागांवरून पुन्हा वाद? अनेक चर्चांना उधाण

केवायसी अपडेट ठेवल्याने, ग्राहकाची अचूक माहिती बँकांकडे राहते. याशिवाय केवायसी अपडेट करून अनेक प्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांना आळा बसू शकतो.

Leave a Comment