PMC News : महापालिका (Pune Municipal Corporation) कामगार युनियनतर्फे (PMC Employee Union) कंत्राटी कामगारांची (Contractual Employee) पिळवणूक होत असल्याच्या विरोधात आज “आक्रोश झाडू मोर्चा ” (Akrosh Zadu Morch) महापालिकेवर काढण्यात आला.
पुणे महानगर पालिकेच्या सर्व खात्यामध्ये सात हजार कंत्राटी कामगार आहेत. गेल्या १५ वर्षापासून तुटपुंज्या वेतनावर स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून कामगार कामे करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून बंद केलेला बोनस (Bonus), घरभाडे (Home Rent) भत्ता (Allowance), रजावेतन (leave pay) फरकासह बंद आहे. ही सर्व रक्कम कामगारांना दिवाळी (Diwali Festival 2022) पूर्वी अदा करण्यात यावी. भविष्य निर्वाहनिधी (PF), ईएसआय (ESI), दरमहाचे वेतन १० तारखेच्या आत अदा करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यासाठी ‘आक्रोश झाडू मोर्चा’ महापालिकेवर काढण्यात आला. तसेच अपघात नुकसान भरपाई, दवाखान्यात मोफत उपचार कंत्राटी कामगाराना मिळाला पाहिजे.
- Pune Public Issue News : नागरिकांनी केले रस्त्यासाठी आंदोलन – कोंढवा डेव्हलपमेंट फोरमने घेतला पुढाकार
- Army Area News : म्हणून लष्कराच्या परिसरात नव्याने होणाऱ्या बांधकामांना लागला ब्रेक
- Pune Politics News : शेवटी पुणेकरांच्या मिळकत कराच्या प्रश्नात राज ठाकरेंनी घातले लक्ष
- Fashion Tricks: स्टायलिश दिसायचे तर वाचाचया टिप्स.. लव्हली वुमन म्हणून मिरवा की
महानगरपालिकेच्या आयुक्तांनी १७ मे २०२१ रोजी कंत्राटी कामगारांना किमान वेतन अदा करणे विषयीच्या सुधारित परिपत्रकाप्रमाणे किमान वेतन लागू करावा तसेच ठेकेदार जरी बदलला तरी कंत्राटी कामगारांना कमी करू नये, ओळखपत्र वेतन चिठ्ठी, एसआयची सुविधा त्वरित कंत्राटी कामगारांना मिळाली पाहिजे हे कायद्याने बंधनकारक आहे. कामगार कायद्याप्रमाणे बोनस, घरभाडे भत्ता, व रजावेतन शिवाय टेंडरच्या अटीशर्तीनुसार कामाचे साहित्य, गणवेश व इतर सुविधा पुरविणे बंधनकारक असताना ठेकेदार कंत्राटी कामगारांना पुरविल्या जात नाहीत. या सर्व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांना प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावरची व कायदेशीर लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी कंत्राटी कामगारांनी युनियनच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे एकजूटीने व भक्कम ताकदीने लढा उभा करण्याचे आवाहन अध्यक्ष उदय भट यांनी केले.
कंत्राटी कामगारांचे प्रश्न व विविध मागण्याच्या संदर्भात युनियनचे शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर चर्चे दरम्यान अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांनी दोन ते तीन दिवसात युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ ,असे आश्वासन दिले.
सदर निदर्शनामध्ये युनियनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत गमरे, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, कार्यालयीन चिटणीस वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दिलीप कांबळे, ओंकार काळे, शोभा बनसोडे, राम अडागळे, धनंजय आयवळे, रोहीणी जाधव, जयश्री भिसे, करुणा गजधनी, अरुण शेलार, रमेश पारसे, तानाजी रिकीबे ज्येष्ठ सल्लागार प्रकाश हुरकडकली यांनी मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले व सभेचा समारोप राजेश पिल्ले यांनी केला.