PMC Exam Result News : महापालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेतील (PMC recruitment) परीक्षांचा टप्पा पूर्ण झाला आहे. यापैकी कनिष्ठ अभियंता (Junior Engineer-Civil) या परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री उशीरा जाहीर झाला आहे. यात २०० पैकी १८० गुण घेणारा उमेदवार पहिला आहे. १५० जणांना कागदपत्रे पडताळणीसाठी (Document Verification) ३१ ऑक्टोबरला (October) महापालिकेत बोलविण्यात आले आहे. महापालिकेच्या इतर पदांचा निकाल प्रतिक्षेत आहे.
- Pune Public Issue News : नागरिकांनी केले रस्त्यासाठी आंदोलन – कोंढवा डेव्हलपमेंट फोरमने घेतला पुढाकार
- Maharashtra politics : शेतकरी आत्महत्यांचे (farmers sucide) पाप “त्यांचेच”; वासुदेव काळे (BJP Kisan Morcha State president Vasudev Kale)
- Technology : चीनला मोठा झटका..! जगातील ‘या’ दिग्गज कंपनीबाबत भारताबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- Goa Business News : म्हणून गोव्यात आता बिअर महागणार
महापालिकेतर्फे ४४८ पदांसाठी नाेकरभरती करण्यात येत आहे. यामधील विविध पदांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले होते. मात्र, यापैकी सरासरी ७० टक्के उमेदवारांनीच परीक्षा दिली. राज्यासह काही अन्य राज्यांमध्ये भरती घोटाळे गाजले होते. त्यामुळे या भरतीप्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी महापालिकेने परीक्षेचे काम इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (Indian banking personal selection) आयबीपीएस या संस्थेला दिले आहे.
या संस्थेने ऑनलाइन (Online exam) माध्यमातून ही परीक्षा घेतली. या संस्थेकडून परीक्षेचा निकाल तयार करून पालिकेला दिला जाणार आहे. त्यानंतर पालिका प्रशासन निकाल जाहीर करेल. दरम्यान, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.
या परीक्षांपैकी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी (Junior Engineer Mechanical) आणि कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planner) या दोन परीक्षांचा निकाल पूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. यात निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सध्या केली जात आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer Civil) परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर झाला. सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Low officer) पदाचा निकाल एक दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant encroachment inspector) पदाचा निकाल या आठवड्यात जाहीर होईल. कारकून (clerk) पदासाठी सर्वाधिक उमेदवार असल्याने या निकालासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC deputy commissioner Sachin Ethape) यांनी सांगितले.
तीव्र चुरस
महापालिकेत ४४८ जागांसाठी ८७ हजार हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ६७ हजार जणांनी परीक्षा दिली. सर्वसाधारणपणे प्रत्येक जागेसाठी सरासरी १५० जण रांगेत आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) एका पदासाठी ९४, कनिष्ठ अभियंत्याच्या (यांत्रिकी) एका जागेसाठी २९३, कारकून पदासाठीच्या एका जागेसाठी २५० तर सहाय्यक विधी अधिकारी पदासाठीच्या एका जागेसाठी १२४ उमेदवार स्पर्धेत आहेत.