Pune News : महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळी ऍडव्हान्स (Diwali Advance) देण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी १०,००० उचलची रक्कम जमा करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून (Municipal Administration) देण्यात आली. दरम्यान बोनसचे सर्कुलर (Bonus Circular) मात्र अजूनही जारी करण्यात आलेले नाही. लेखा विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत आयुक्ताकडून यावर कुठलेही मोहर लावण्यात आली नव्हती.
- Pune Municipal Corporation : महापालिकेत साखळी बॉम्ब स्फोट
- Pune News : दिवाळीचा पासारा आवरा अन महापालिकेला कळवा
- IMD : पावसाबाबत महत्वाचे अपडेट.. ‘या’ राज्यांत आणखी काही दिवस मुसळधार बरसणार
- Dengue : डेंग्यूबाबत महत्वाची माहिती.. 5 वर्षात ‘या’ जिल्ह्यांत सापडले इतके रुग्ण; जाणून घ्या..
पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी (officers and employees of Pune Municipal Corporation) यांना दिवाळीच्या मुहूर्तावर सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो. त्याचप्रमाणे बक्षिसही दिली जातात. मात्र यंदा दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासनाकडून अजूनही बोनसबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही.
महापालिका कर्मचाऱ्यांना सणासाठी दहा हजार रुपयांची उचल रक्कम दिली जाते. कर्मचारी आपल्या सोयीनुसार ही रक्कम दिवाली (Diwali 2022 ), ईद (Eid ) सारख्या मोठ्या सणासाठी घेऊ शकतात. नंतर दहा महिन्यात ही रक्कम वसूल केली जाणार आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून कर्मचारी ही रक्कम दिवाळीलाच घेतात. उचल जमा झाल्याने कर्मचारी दिवाळीची खरेदीला सुरुवात करू शकतात. दरम्यान बोनसचे सर्कुलर (Bonus Circular) मात्र अजूनही जारी करण्यात आले नाही. लेखा विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत आयुक्तांकड्न यावर मोहर लावण्यात आली नव्हती. याबाबत गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनांनी देखील आयुक्तांची भेट घेतली होती.