PM Swearing In Ceremony : मोदींची हॅट्रिक! सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत रचला इतिहास

PM Swearing In Ceremony : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने 294 जागा जिंकत बहुमत मिळवले. आज नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. यावेळी भाजपसह एनडीएच्या एकूण 80 खासदारांनी देखील मंत्रपदाची शपथ घेतली आहे.

नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. यानंतर अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. यानंतर निर्मला सीतारामन आणि मनोहर लाल खट्टर यांनी देखील शपथ घेतली.

कोण कोण पाहुणे होते उपस्थित?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सात देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले होते. या समारंभात मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिक,श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते.

महात्मा गांधींना केले प्रथम अभिवादन

आज सकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जात आदरांजली वाहिली. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

सर्वात अगोदर मोदींनी महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ‘सदैव अटल’ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना देखील आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह उपस्थित होते.

Leave a Comment