PM Svanidhi Scheme । सरकारची जबरदस्त योजना! कोणत्याही हमीशिवाय मिळेल 50 हजारांपर्यंत कर्ज

PM Svanidhi Scheme । जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही आता सरकारी मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. सरकारच्या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही हमीशिवाय 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. या कर्जाच्या मदतीने तुम्हाला तुमचा व्यवसाय सहज चालू करता येईल. सरकार स्वयंरोजगाराला चालना देत आहे.

काय आहे पीएम स्वानिधी योजना?

या योजनेत तुम्ही कोणत्याही हमीशिवाय सहज कर्ज घेता येईल. कर्जाच्या रकमेच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. यात सरकार 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या योजनेत प्रथम 10,000 रुपये, दुसऱ्यांदा 20,000 रुपये आणि तिसऱ्यांदा 50,000 रुपये कर्ज मिळेल. योजनेंतर्गत मिळालेली कर्जाची रक्कम 12 महिन्यांच्या आत म्हणजे 1 वर्षात परत करावी लागेल.

जाणून घ्या योजनेचे फायदे

मुदतपूर्व कर्ज परतफेडीवर तुम्हाला ७ टक्के सबसिडीचा लाभ
डिजिटल पेमेंट करण्यावर मिळेल सरकार कॅशबॅक
लाभार्थीला 25 रुपये ते 100 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा मिळेल लाभ

असा करा अर्ज

  • तुम्हाला कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्यासाठी, अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून कागदपत्रे संलग्न करा.
  • यानंतर तुम्ही कोणत्या व्यवसायासाठी कर्ज घेत आहात हे सांगा.
  • आता बँकेकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.
  • कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्ज मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते क्रमांक (बँक खाते तपशील)
  • मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड
  • पत्ता पुरावा

Leave a Comment