PM Surya Muft Bijli Yojana : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता नागरिकांना तब्बल 300 युनिट वीज मोफत मिळू शकते.
उन्हाळ्यात देशातील नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो. हवामानात झालेल्या बदलामुळे देशातील बहुतेक राज्यांमध्ये उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणात घरामध्ये एसी, गिझर, हिटर, फ्रिज, कुलर यासारख्या विद्युत उपकरणाची उपकरणांची संख्या वाढली आहे. यामुळे आता सरकारने या योजनेतून 300 युनिट वीज मोफत देण्याची व्यवस्था केली आहे. चला मग जाणून घेऊया तुम्हाला 300 युनिट वीज मोफत कशी मिळू शकते.
काही दिवसापूर्वी सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केली आहे. या योजेतंर्गत देशातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. या घरांना 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे.
सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर केली आहे आणि मंत्रिमंडळाकडून ती मंजूर करण्यात आली आहे. जेणेकरून आता लोक प्रधानमंत्री सूर्य योजनेसाठी अर्ज करू शकतील आणि त्याचा लाभ घेऊ शकतील.
‘या’ पक्षाकडून नाना पाटेकर लढणार लोकसभा निवडणूक, गोविंदा, राज बब्बर यांना काँग्रेस देणार संधी?
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांच्या घरांच्या छतावर हे पॅनल बसवले जातील, ज्यामुळे येथील लोकांना 300 युनिट मोफत वीज मिळेल.
छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांसाठी सरकार देशातील एक कोटी कुटुंबांना अनुदान देत आहे. वास्तविक, या योजनेअंतर्गत 2 किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जेवर 60% अनुदान दिले जाणार आहे.
महायुतीसाठी अमित शहा तयार करणार मास्टर प्लॅन, जागावाटपाचा फॉर्म्युला होणार फिक्स?
13 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम मोदींनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली. या योजनेसाठी सरकारने 75 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे, सर्व अनुदान केंद्र सरकार देणार आहे.