Pm Surya Ghar Yojana । करोडो कुटुंबांना मिळणार ‘इतकी’ मोफत वीज, जाणून घ्या सरकारची योजना

Pm Surya Ghar Yojana । सरकारने अनेक योजनांना सुरुवात केली आहे. सरकारची अशीच एक योजना आहे या योजनेअंर्तगत 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

75,021 कोटी रुपये होणार खर्च

गुरुवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अशी माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पीएम सूर्य घर योजने’ला मंजुरी दिली आहे. या मोफत वीज योजनेंतर्गत देशातील 1 कोटी कुटुंबांच्या घरांवर सौर पॅनेल बसवले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पावर केंद्र सरकार एकूण 75,021 कोटी रुपये खर्च करणार असून प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर व्हिलेजही विकसित केले जाईल.

पंतप्रधान मोदींनी केले लॉन्चिंग

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्यात १३ फेब्रुवारी रोजी पीएम सूर्य घर योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 300 युनिट मोफत वीज मिळेल. घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्या लोकांच्या खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारकडून या योजनेत अनुदान पाठवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

रूफटॉप सोलर पॅनेलसाठी अर्ज करणाऱ्यांना 1 किलोवॅट पॅनेलसाठी 30,000 रुपये आणि 2 किलोवॅट पॅनेलसाठी 60,000 रुपये अनुदान मिळेल. 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या सिस्टीमसाठी 78000 रुपये अनुदान मिळेल.

करा हे काम

लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा. स्वत:चे घर असलेले गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेले कुटुंबांना अर्ज करता येईल. सरकारकडून सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागेल. नेट मीटर बसवल्यानंतर, DISCOM द्वारे पडताळणी केल्यानंतर, पोर्टलवरून तुम्हाला एक कमिशनिंग प्रमाणपत्र जारी करण्यात येईल.

सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागेल. प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला धनादेश पोर्टलवर सबमिट करावा लागेल. यानंतर सबसिडी तुमच्या बँक खात्यावर पाठवण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वात अगोदर अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in वर जाऊन रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा निवडा.
  • तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीचे नाव निवडून तिथे तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका.
    यानंतर ग्राहक क्रमांक आणि मोबाइल टाकून नवीन पेजवर लॉगिन करा. फॉर्म ओपन करताच, यात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रूफटॉप सोलर पॅनेलसाठी अर्ज करा.
  • प्रक्रिया पूर्ण करताच तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या डिस्कॉममध्ये नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करू शकता.
  • सोलर पॅनल बसवल्यानंतर, पुढील चरणात तुम्हाला प्लांटच्या तपशीलासह नेट मीटरसाठी अर्ज करावा लागणार आहे.

Leave a Comment