Pakistan : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील लक्की मारवत येथे पोलिस व्हॅनवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद ही पाकिस्तानची प्रमुख समस्या असल्याचे त्यांनी मान्य केले. या हल्ल्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कायमच दहशतवादाला खतपाणी घालून संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानलाच आता या दहशतवादाचे चटके बसत आहेत. येथील राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करत असले तरी त्याचे स्पष्ट परिणाम आता दिसत आहेत. त्यामुळेच राज्यकर्ते आता ही गोष्ट मान्य करू लागले आहेत.
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, दहशतवाद ही पाकिस्तानची प्रमुख समस्या आहे. आमचे सशस्त्र दल आणि पोलिसांनी या संकटाचा शौर्याने सामना केला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री यांनीही लक्की मारवत येथील पोलीस कर्मचार्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि मुख्य सचिव आणि आयजी खैबर पख्तूनख्वा यांच्याकडून या घटनेचा अहवाल मागवला.
पाकिस्तानमध्ये याआधीही अनेक वेळा असे दहशतवादी हल्ले झालेले आहेत. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचे काम सुरू असतानाही चीनी नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. आता येथील परिस्थिती अशी आहे, की केव्हा हल्ला होईल याचा काहीच अंदाज येत नाही. या परिस्थितीला जबाबदार कोण आहेत, हा मुद्दा वेगळा असला तरी या दहशतवादाचे दुष्परिणाम तेथील नागरिकांनाही भोगावे लागत आहेत. या घटनांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात सरकारकडून होत असल्याचे दिसत असले तरी त्याचा फारसा फरक पडलेला नाही. कारण या घटनांत सातत्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे सरकारचेही टेन्शन वाढले आहे.
- Read : Joe Biden On Pakistan: हा देश आपल्या सर्वांसाठी धोकादायक! त्याला लगाम घालणे आवश्यक; राष्ट्राध्यक्ष बायडेनचे वक्तव्य
- Pakistan : बाब्बो.. पाकिस्तानमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळतेय पेट्रोल; महागाईने सरकारही हैराण