PM Narendra Modi: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेला आणि तुरुंगात गेलेला एक माणूस, जबाबदार संपादक, 1949-51 मध्ये संविधान सभेचा सदस्य, मंत्री, स्पीकर आणि राज्यपाल ही अशी महत्वाची पदे भूषवली होती तरीही ते एका वाक्यासाठी बदनाम म्हणूनच ओळखले जातात. साहजिकच ते आताचे जसे धर्मांध कृत्रिम राष्ट्रवादी असतात तसेच होते असेही नाही. तरीही डीके बरुआ यांच्या नावावर अत्यंत कुप्रसिद्ध आणि असंवैधानिक विधान चिकटलेले आहे. ऐतिहासिक दाखला म्हणून हे वाक्य अनेकदा ऐकवले जाते. हुकुमशाही प्रवृत्तीचा दाखला म्हणून हे वाक्य सांगितले जाते. ते वाक्य म्हणजे, “इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा..!” याचा मराठीत अर्थ होतो की, “इंदिरा भारत आहे आणि भारत इंदिरा आहे!” (Indira Gandhi Political Style article in marathi)
यातून देशापेक्षा आणि मुख्य म्हणजे कोट्यवधी जनतेच्यापेक्षा एक नेता खूप मोठा असतो आणि त्याने काहीही केले तेच देशाचे काम असते. यासह त्या नेत्याचा निर्णय सर्वांनी मान्य करायला पाहिजे असाही अट्टहास असतो. आताही भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत असेच चित्र असल्याची टीका वेळोवेळी होत असते. आताही बीबीसी प्रकरणाच्या निमित्ताने जगाला असेच वाटत आहे. यावर hindi.thequint.com या वेबसाइटने खास लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, “चापलूसीच्या नावाखाली त्यांनी इंदिराजींच्या नावातील ‘आर’ काढून आपल्या नेत्याचे दैवतीकरण करण्याची निर्लज्ज परंपरा भारत देशात स्थापन केली. ज्याने भारतीय राजकारणात राष्ट्रीय ते प्रादेशिक स्तरापर्यंत सर्व पक्षांमध्ये सध्या घर केले आहे.” अर्थात यामुळे लोकशाही हीच आता झुंडशाही झाली आहे. धर्म आणि जातीच्या मुद्द्यावर मतदान करणारे मतदार याच झुंडशाहीला खतपाणी घालत आहेत.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
‘गूंगी गुड़िया’ (मुकी बाहुली) या राजकीय टोमण्यापासून ते ‘आयर्न लेडी ऑफ इंडिया’ म्हणून खंबीरपणाचे प्रतीक बणण्यात इंदिरा गांधी यांनी यश मिळवले होते. ‘अपनी कैबिनेट की एकमात्र पुरुष’ या लैंगिक टिप्पणीपर्यंत काहींची मजल गेली. त्यामुळेच डीके बरुआ, सिद्धार्थ शंकर रे, रजनी पटेल आदींनी नेत्यांची उपासना करत इंदिरा गांधींचे रूपांतर हुकूमशहामध्ये केले. त्या व्यक्तिपूजेचा परिणाम असा झाला की, राज्यघटनेच्या कलम 352 अन्वये राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी कथित ‘आंतरिक गडबड’ म्हणून देशात थेट आणीबाणी जाहीर केली होती. हे एका राजकारण्याच्या सत्तेच्या नशेत स्वत:च सर्वशक्तिमान असल्याच्या अंधविश्वासाचे लक्षण होते.
मुळात इंदिरा गांधींनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना (पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षात) अनेकदा थेट पायदळी तुडवले. त्यांनी लोकशाहीवादी अशा सर्व संस्थांना उद्ध्वस्त केले. त्यावेळी तर राज्यघटना बदलण्याची चर्चा जोर धरू लागली होती आणि राजकीय चापलूसीची प्रवृत्ती ही खूपच सामान्य मानली जात होती. इंदिराजींनी वैयक्तिकरीत्या किंवा त्यांच्या राजकीय उंचीवर परिणाम करणाऱ्या आंधी, किस्सा कुर्सी का, यमगोला आणि नसबंदी इत्यादी चित्रपटांवर म्हणून बंदी घातल्याचा इतिहास आहे. मात्र, सलमान रश्दी, व्हीएस नायपॉल किंवा ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग चॅनल (बीबीसी) यांसारखे स्वतंत्र माध्यम चॅनेल भारतीय नसल्याने किंवा भारतात कारवाई करण्याची क्षमता नसल्याने त्यांच्या मनमानी पद्धतींवर टीका करूनही टिकाव धरू शकले. त्यावेळी बीबीसीवर बंदी घालण्यासाठी इंदिरा गांधींनी राष्ट्रवादाच्या सदाबहार अशाच सूत्राचा अवलंब केला. “बीबीसी संस्था कधीही भारताची बदनामी करण्याची संधी सोडत नाही आणि त्यात फक्त आणि फक्त भारतविरोधी बदनामीकारक बातम्या असतात”, असा युक्तिवाद त्यावेळीही केला जात होता. ‘भारतविरोधी’ कथांच्या यादीत (ज्यात फँटम इंडिया आणि कलकत्ता यांसारख्या माहितीपटांचा समावेश होता) 1969 च्या अहमदाबाद जातीय दंगलीचे कव्हरेज समाविष्ट होते. एक समूहाने इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिपूजेचे वातावरण निर्माण करण्यास मदत केली आणि इंदिराजींना दुर्गा असे माजी दिवंगत पंतप्रधान आणि भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. द इकॉनॉमिस्टने तर ‘भारताची सम्राज्ञी’ असे म्हणताना भारताची नैसर्गिक शासक असेही म्हटले होते.
अगदी 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींच्या दुःखद हत्येनंतरही व्यक्तिपूजेची प्रथा संपलेली नाही. तथापि, नंतरच्या काळात राजीव गांधी, व्हीपी सिंग, चंद्रशेखर, पीव्ही नरसिंह राव, देवेगौडा, आयके गुजराल, वाजपेयी किंवा अगदी मनमोहन सिंग यांसारखे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या अशा स्वमग्न पातळीवर कधीच पोहोचले नाहीत. या सर्वांनी आपापल्या परीने अनेकदा संस्थांना साचेबद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाही, परंतु प्रादेशिक, सामाजिक, बौद्धिक किंवा वैचारिक प्रसाराचे मोजके काही प्रयत्न सोडले तर त्यापैकी कोणीही इंदिरा गांधींच्या प्रमाणे मिरवून घेण्यात धन्यता मनाली नाही. मात्र, आता देशात असेच इंदिरा युग म्हणजे मिरवून घेण्याची राजकीय संस्कृती फोफावली असल्याची टीका होत आहे.
2014 ला मात्र देशात वेगळीच लाट आली. जुन्या नेत्यांना अनोख्या ‘मार्गदर्शक मंडळा’मध्ये टाकून सर्व संभाव्य विरोधक आणि पर्यायांचा नायनाट करून राष्ट्रीय स्तरावर एक नवीन शक्ती उदयास आली. विशेष म्हणजे अरुण शौरी, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, बीसी खंडुरी यांसारख्या स्वच्छ, अधिक उदारमतवादी आणि बुद्धिवादी लोकांचीही मागणी या देशातून संपली. ‘नमो’ हा जप आला. जो ‘दुर्गा’ या जुन्या धार्मिक प्रतिकात्मक नावाप्रमाणेच आहे. ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये आदरपूर्वक पालन करणे किंवा नमन करणे असाच होतो. इंदिरा गांधीच्या कालखंडाप्रमाणेच सध्या ‘भारतविरोधी’ प्रतिहल्ल्यांचा सामना केला जात आहे. सर्वशक्तिमान नेत्याच्या नावाचा जप महत्त्वाच्या बैठकीच्या ठिकाणी (संसदेसह) आणि सर्वत्र होतो आहे. त्याला विशेष महत्त्व आलेले आहे. या इको-सिस्टीम आणि संस्कृतीवर सगळे मंत्रमुग्ध (किंवा संमोहित) आहेत. प्रेक्षक देखील त्याचे आनंदाने अनुसरण करतात. अमेरिकन लेखक रॉबर्ट ए. हेनलेनची याबद्दल संक्षिप्त टिप्पणीआहे की, “जवळजवळ प्रत्येक पंथ किंवा धर्म त्यांच्या पद्धतीने कायदा करेल.”