PM Modi Oath Ceremony : इतिहास रचत सलग तिसऱ्यांदा घेतली नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ, जाणून घ्या NDA सरकारच्या मंत्र्यांची पूर्ण यादी

PM Modi Oath Ceremony : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने 294 जागा जिंकत बहुमत मिळवले. आज नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. यावेळी भाजपसह एनडीएच्या एकूण 80 खासदारांनी देखील मंत्रपदाची शपथ घेतली आहे.

नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. यानंतर अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. यानंतर निर्मला सीतारामन आणि मनोहर लाल खट्टर यांनी देखील शपथ घेतली. जाणून घ्या NDA सरकारच्या मंत्र्यांची पूर्ण यादी.

NDA सरकारच्या मंत्र्यांची पूर्ण यादी

 • नरेंद्र मोदी- सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून ते उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत.
 • राजनाथ सिंह- राजनाथ सिंह हे देशाचे गृह आणि संरक्षण मंत्री राहिले आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषवले आहे.
 • अमित शहा- अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष राहिले असून ते सलग दुसऱ्यांदा गांधीनगरमधून खासदार झाले आहेत. चार वेळा गुजरातचे आमदार राहिले आहेत. तसेच ते गुजरातचे माजी गृहराज्यमंत्रीही आहेत.
 • नितीन गडकरी- नितीन गडकरी हे 2014 पासून मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून ते भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नागपूरमधून निवडणूक जिंकून ते सलग तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत.
 • जेपी नड्डा- जेपी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. तसेच ते हिमाचल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत.
 • शिवराज सिंह चौहान- शिवराज सिंह चौहान यांनी प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी मध्य प्रदेशातील विदिशामधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
 • निर्मला सीतारामन- निर्मला सीतारामन या मागील सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या. राज्यसभेचे खासदार आहेत.
 • एस जयशंकर- परराष्ट्र सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते देशाचे परराष्ट्र मंत्री झाले असून ते दोन वेळा राज्यसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
 • मनोहरलाल खट्टर- मनोहरलाल खट्टर यांनी प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ते 9 वर्षे हरियाणाचे मुख्यमंत्री होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आहेत. ते कर्नाल, हरियाणातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत.
 • एचडी कुमारस्वामी- एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहे. तेमाजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा आहे. ते तिसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले आहेत. ते एनडीएचा मित्रपक्ष जनता दल सेक्युलरचे नेते आहेत.
 • पियुष गोयल- पियुष गोयल हे राज्यसभेत नेते आहेत. ते पहिल्यांदाच लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी ते राज्यसभेचे सदस्य म्हणून खासदार झाले आणि ते गेल्या सरकारांमध्ये मंत्री होते. ते उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार निवडून आले आहेत.
 • धर्मेंद्र प्रधान- धर्मेंद्र प्रधान हे मागील सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. ओडिशातील संबलपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली.
 • जीतन राम मंदी – जीतन राम मंदी हे हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते, एनडीए आघाडीचे मित्र आहेत. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. दलित समाजातून आलेला आणि पहिल्यांदाच खासदार झाले आहे.
 • लालन सिंग- लालन सिंग हे एनडीएचा मित्रपक्ष जनता दल युनायटेडचा नेते आहे. ते जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असून भूमिहार समाजाचे असून ते मुंगेरमधून खासदार निवडून आले आहेत.
 • सर्बानंद सोनोवाल- सर्बानंद सोनोवाल हे आसामचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि ते मागील सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. त्यांनी आसाममधील दिब्रुगडमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

Leave a Comment