PM Kisan Yojana: केंद्र सरकार लवकरच देशातील करोडो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार राबवत असलेल्या पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याची तारीख ठरली आहे.
अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार यावेळी 28 जुलै रोजी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातील.
याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे
सरकारने दिलेल्या सर्व माहितीनुसार, यावेळी 14व्या हप्त्याच्या स्वरूपात देशातील 9 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. पीएम मोदी 28 जुलै रोजी DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 18 कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. याआधी 27 फेब्रुवारीला पीएम किसानचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला होता.
वर्षभरात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. आर्थिक वर्षात, पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान हस्तांतरित केला जातो.
यापूर्वी, पीएम किसान योजनेतील लाभार्थी स्थिती पाहण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. पीएम किसानचे मोबाईल अॅप्लिकेशनही सरकारने सुरू केले आहे. आता लाभार्थी स्थिती पाहण्याची पद्धत बदलली आहे. तुम्हाला लाभार्थी स्थिती पाहायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक आवश्यक असेल.