PM Kisan Yojana । PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी टाळाव्यात या चुका, नाहीतर..

PM Kisan Yojana । सरकार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा लाभही देशातील करोडो शेतकरी घेत असतात. पण अशा काही सरकारच्या योजना आहेत ज्यांची शेतकऱ्यांना कल्पना नसते, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. दरम्यान, सरकारची अशी एक योजना आहे, त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

पीएम किसान योजना

या योजनेचे नाव पीएम किसान योजना असे आहे. या योजनेला जगातील सर्वात मोठी DBT योजना म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची पडताळणी विहित मुदतीत करून घ्यावी. तुम्ही असे केले नाही तर तो योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करावा लागणार आहे.

तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले नसल्यास तरीही तुम्ही योजनेच्या लाभांपासून वंचित राहू शकता. भरलेल्या अर्जात चूक आढळून आली तरी शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्ज भरत असताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.

काळजीपूर्वक तपासा तपशील

अर्ज भरत असताना शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, लिंग, आधार क्रमांक, बँक खाते तपशील बरोबर तपासावे. समजा शेतकरी बांधवांना त्यांची स्थिती जाणून घ्यायची असेल तर ते पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर चेक करू शकतात. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पाठवण्यात येतात.

अशी तपासा स्थिती

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या अधिकृत साइटला भेट द्यावी लागणार आहे.
आता ‘फार्मर कॉर्नर’ विभागातील ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.
आता शेतकऱ्याला त्याचा आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा फोन नंबर टाका.
यानंतर शेतकऱ्याला कॅप्चा भरावा लागेल.
आता तुमच्या स्क्रीनवर स्टेटस पाहायला मिळेल.

Leave a Comment