PM Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात येणार पैसे

PM Kisan Yojana । शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या याचा समस्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने योजना राबवायला सुरुवात केली आहे. अशातच आता देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

PM किसान सन्मान योजना

PM किसान सन्मान योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. ज्यात तीन हप्त्यांमध्ये पैसे थेट खात्यात पाठवण्यात येतात. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. सरकारच्या मतानुसार या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ११ कोटींहून जास्त आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत 2.80 लाख कोटी रुपयांची रक्कम सरकारने दिली आहे, अशी माहिती संकेतस्थळावर दिली आहे.

शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा

पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर 2023 मध्ये जारी केला होता, त्यानंतर सर्व शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची आणि या वर्षातील पहिल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असून लवकरच आता या करोडो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. पुढील आठवडाभरात हा हप्ता मिळणार असून ज्या शेतकऱ्यांनी अजून आपले खाते अपडेट केलेले नाही, त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार नाही. ज्यांचे KYC पूर्ण झाले आहे अशा खात्यांमध्येच पैसे जमा करण्यात येणार आहे.

देशभरातील शेतकरी हप्ता जारी होण्यापूर्वी त्यांची स्थिती तपासू शकतात. यासाठी त्यांना सर्वात अगोदर योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागणार आहे, त्यानंतर लाभार्थी स्टेटसवर जाऊन त्यांची स्थिती पाहता येईल. 28 फेब्रुवारीला लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

Leave a Comment