PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेसाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल, शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी भेट

PM Kisan Yojana : जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दुहेरी भेट मिळणार आहे.

दरवर्षी मिळतात 6 हजार रुपये

शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करते. हे लक्षात घ्या की पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देते. पीएम किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर 3 वेळा 2-2 हजार रुपये पाठवण्यात येतात.

20 जूनपर्यंत चालणार मोहीम

प्रधान मंत्री किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, संतृप्ति मोहीम पीएम किसान योजनेचे लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही ग्रामस्तरीय संपृक्तता मोहीम 20 जून 2024 पर्यंत चालेल. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेद्वारे, देशातील प्रत्येक पात्र शेतकरी या मोहिमेत सामील होऊ शकतो आणि सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

ही कामे होणार पूर्ण

इतकेच नाही तर इतर महत्त्वाची कामे देखील या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना पूर्ण करता येतील. ज्यात खते आणि बियाणे खरेदी, पीक विमा, ई-केवायसी प्रक्रिया आणि कृषी उपकरणे खरेदीशी निगडित काम देखील केले जाऊ शकते.

कधी येणार पुढील हप्ता?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी, केंद्र सरकारने 16 वा हप्ता जारी केला होता. ज्यात पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता देण्यात आला. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले होते. हे लक्षात घ्या की प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने येतो.

अशा परीस्थितीत फेब्रुवारीपासून पुढील चार महिने जूनमध्ये संपत आहेत. पण अधिकृतपणे हप्ता कधी जाहीर होणार याबाबत अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच नवीन सरकार स्थापन होणार असून माध्यमांच्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, 17 वा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जारी केला जाईल.

Leave a Comment