PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. ज्याचा आज देशातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. या योजनेचा लवकरच 17 वा हप्ता जमा होणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. हे लक्षात घ्या की ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या दिली जाते. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि मार्च महिन्यात या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून तीन वेळा पाठवण्यात येते.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही रक्कम
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात घ्या की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करणेही खूप गरजेचे आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या नसतील तर ही सर्व कामे पूर्ण करा. नाहीतर पुढील हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार नाही.
ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी, प्रादेशिक किंवा सार्वजनिक उपक्रमात काम करत आहेत त्यांनाही पीएम किसान सन्मान निधीकडून पैसे दिले जाणार नाहीत. विशेष म्हणजे आयकर भरणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
कधी येणार 17 वा हप्ता?
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात जारी केली जाईल. पण याबाबत सरकारकडून अजूनही कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.