PM Kisan Yojana : 18 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे! आजच पूर्ण करा ‘हे’ काम, नाहीतर मिळणार नाही लाभ

PM Kisan Yojana : किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता 18 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण जर तुम्ही काही महत्त्वाचे काम केले नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीशी निगडित फाइलवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आता या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

या योजनेची पुढील घोषणा पीएम मोदी 18 जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून करणार आहेत. हा हप्ता डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येईल. देशभरातील सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळणार असून 18 जून रोजी सुमारे 20 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाईल. योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांनी हस्तांतरित केला जाईल.

आजच पूर्ण करा हे काम

समजा तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर ते त्वरित करा नाहीतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. प्रधानमंत्री किसान योजनेच्या वेबसाईटवर जा आणि e-KYC साठी नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून पुढे OTP टाका. यानंतर, ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

ई-केवायसी

हे लक्षात ठेवा पीएम किसान योजनेअंतर्गत, अर्जदार पीएम किसान ॲपमध्ये लॉग इन करून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करता येईल. विशेष म्हणजे प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि कोणत्याही कागदपत्रांची गरज पडत नाही.

अर्जदाराने फक्त त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा आणि त्यानंतर ते त्यांचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया खूप सोपी असून जी काही मिनिटांत पूर्ण केली जाऊ शकते.

तसेच ऑफलाइन ई-केवायसीसाठी, अर्जदाराला कॉमन सर्व्हिस सेंटरवर जावे लागणार आहे. ई-केवायसीची प्रक्रिया अर्जदाराच्या बायोमेट्रिक माहितीद्वारे पूर्ण करण्यात येईल.

Leave a Comment