PM Kisan Yojana: केंद्र सरकार राबवत असणारी लोकप्रिय योजना पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता जुलैच्या अखेरीस येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे येत्या काही दिवसात देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात दोन- दोन हजार रुपये जमा होणार आहे.
अधिकृत वेबसाइटनुसार पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 2,000 रुपये पाठवणार आहेत आणि 18 हजार रुपये डीबीटीद्वारे जारी केले जातील.
पीएम किसान खात्यात ई-केवायसी आवश्यक आहे
याआधी 27 फेब्रुवारीला पीएम मोदींनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता पाठवला होता. दुसरीकडे, जर शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचे PM किसान खाते E-KYC लवकरात लवकर करून घ्यावे नाहीतर त्याचा पुढचा हप्ता अडकू शकतो.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या खात्यात ई-केवायसी करू शकता
दुसरीकडे ज्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचे पीएम किसान खात्यासाठी ईकेवायसी झालेले नाही, त्यांनी हे काम त्वरित करावे. त्याचवेळी पीएम किसान पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही हे काम घरी बसून करू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन EKYC करून घेऊ शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी केलेली नाही त्यांनी यासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून हे काम करून घेता येईल.
या पद्धतीने करा चेक
तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जा आणि लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. येथे तुमचा नोंदणी क्रमांक किंवा 10 अंकी मोबाइल क्रमांक टाका. मग स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करा यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसेल.
जर EKYC, पात्रता, जमीन पडताळणी यांच्यासमोर Yes लिहिल्यास तुम्हाला लाभ मिळेल. पण जर कोणाच्याही समोर No लिहिले तर तुम्हाला लाभापासून वंचित राहावे लागेल.