PM Kisan Samman Nidhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 11 वा हप्ता जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येऊ लागले आहेत. केंद्र सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या मदतीने 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 21,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. परंतु काही कारणास्तव तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर तुम्ही ताबडतोब केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
तक्रार कुठे आणि कशी करायची?
तुमच्या खात्यात 2000 रुपये आले नसतील तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जर या लोकांनी तुमचे म्हणणे ऐकले नाही किंवा त्यानंतरही खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही संबंधित हेल्पलाइनवर कॉल करू शकता. हे डेस्क (PM-KISAN Help Desk) सोमवार ते शुक्रवार उघडे असते. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही संपर्क साधू शकता. तरीही काम होत नसेल तर 011-23381092(डायरेक्ट हेल्पलाइन) या क्रमांकावर कॉल करा.
कृषी मंत्रालयाकडे तक्रार कशी करणार?
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे एखाद्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पोहोचत नसतील तर त्याचे त्वरित निराकरण केले जाईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नसतील किंवा काही तांत्रिक अडचण असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त केली जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
तुम्ही येथेही संपर्क करू शकता
तुम्ही स्वतः या योजनेची स्थिती देखील तपासू शकता आणि अर्ज करू शकता. तुम्ही योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. त्याचा दिल्लीतील फोन नंबर 011-23382401 आहे, तर त्याचा ई-मेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सुविधा (कृषी मंत्रालय हेल्पलाइन क्रमांक)
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन नंबर: 011-23381092,23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-60-25109