PM-Kisan : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात येणार पैसे

PM-Kisan : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरु करत असते. यातील जवळपास सर्वच योजना या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असतात. यापैकी एक योजना म्हणजे पीएम-किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पैसे देण्यात येतात. या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

या दिवशी येणार 17 वा हप्ता

आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. याचा अर्थ असा आहे की हप्ता 4 जून नंतर कधीही येऊ शकतो. पण त्याची अधिकृत घोषणा आधी करण्यात येणार आहे.

16 वा हप्ता

मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पीएम-किसान योजनेचा 16 वा हप्ता जारी केला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत 3 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. याचा देशातील 11 कोटीहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे.

काय आहे योजना? जाणून घ्या

हे लक्षात घ्या की, केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू केला. योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6000/- रुपयांचा लाभ देण्यात येतो. हा लाभ दर चार महिन्यांनी रु. 2000/- च्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रदान करण्यात येतो.

आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येतात. सरकारच्या मतानुसार, प्रत्येक चार लाभार्थ्यांपैकी किमान एक महिला शेतकरी आहे. इतकेच नाही तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेंतर्गत लाभार्थी आहेत.

Leave a Comment