PM Kisan : कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, स्वस्त व्याजदरात मिळेल कर्ज; कसे ते जाणून घ्या

PM Kisan : राज्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकार अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेकदा खूप जास्त पैशांची गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांची हीच गरज लक्षात घेता सरकारने एक योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज मिळते.

किसान क्रेडिट योजना

कोणत्याही शेतकऱ्याला मत्स्यपालन, पशुपालन किंवा शेतीशी निगडित व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेऊ शकतो. हे एक प्रकारचे अल्प मुदतीचे कर्ज असून ज्यात शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्जाची सुविधा देण्यात येत आहे. हे कर्ज 2% ते 4% पर्यंत व्याजदराने दिले जात आहे.

हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वेळ दिला जातो. हे कमी व्याज दर, विमा संरक्षण आणि लवचिक परतफेड पर्याय यासारखे अनेक फायदे देते. याशिवाय लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड, बचत खाते आणि डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

असा करा किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज

  • सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
  • तिथे जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज घ्यावा लागेल.
  • पुढे फॉर्मसोबत तुम्हाला ॲड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, आयडी-प्रूफ अशी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
  • हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला बँकेत जमा करावा लागणार आहे.
  • तुमच्या फॉर्मची पडताळणी करून शेवटी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

Leave a Comment