PM Kisan : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. पण अशा काही योजना आहेत ज्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती नसते. आता शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त व्याजदरात कर्ज मिळू शकेल. जर शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला यासाठी एक अर्ज करावा लागेल. काय आहे सरकारची ही खास योजना? जाणून घ्या सविस्तर माहिती.
काय आहे किसान क्रेडिट योजना?
कोणत्याही शेतकऱ्याला मत्स्यपालन, पशुपालन किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्याला किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेता येते. हे एक प्रकारचे अल्प मुदतीचे कर्ज असून ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्जाची सुविधा देण्यात येते. हे कर्ज 2% ते 4% पर्यंत व्याजदराने दिले जाते.
विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ दिला जातो. हे कमी व्याज दर, विमा संरक्षण आणि लवचिक परतफेड पर्याय यासारखे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळतात. इतकेच नाही तर लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड, बचत खाते आणि डेबिट कार्डची सुविधाही मिळते.
शेतकऱ्यांनी असा करा किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज
- हे लक्षात घ्या की सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
- तिथे जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज घ्यावा लागेल.
- फॉर्मसोबत तुम्हाला ॲड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, आयडी-प्रूफ अशी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
- फॉर्म भरल्यानंतर बँकेत जमा करावे लागणार आहे.
- तुमच्या फॉर्मची पडताळणी करण्यात येईल आणि शेवटी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल.