PM Kisan: केंद्र सरकारच्या (Central government) कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ घेण्यासाठी केवायसी (eKYC) अनिवार्य केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) अजूनही केवायसी केलेले नाही. शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यास त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. मात्र आता या योजनेचा लाभ मिळण्यापासून शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी शासनाने केवायसी करण्याची मुदत वाढवून दिली आहे.
Rakesh Jhunjhunwala Death: तुम्हालापण शेअर बाजारातून मोठी कमाई करायची का? तर ‘या’ 5 गोष्टी राकेश झुनझुनवाला यांच्याकडून शिका https://t.co/qVzMAl7RHR
— Krushirang (@krushirang) August 15, 2022
पुन्हा तारीख वाढवली
पीएम किसान सन्मान निधी पोर्टलनुसार, आता शेतकरी 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करू शकतात. याआधीही केंद्र सरकारकडून केवायसी करण्याच्या तारखा वाढवण्यात आल्या आहेत.
घरी केवायसी करा
या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या केवायसी करू शकतात. सोपी प्रक्रिया जाणून घ्या
1. सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जा.
2. वेबसाइटवर, तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये e-kyc वर जावे लागेल.
3. e-kyc वर क्लिक केल्यानंतर, तुम्ही लाभार्थी व्हाल म्हणजे ज्याला सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
4. यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल. ते सबमिट केल्यानंतर, e-kyc प्रक्रिया पूर्ण होईल.
PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खुशखबर..; त्या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये, पटकन करा चेक https://t.co/3IfM9OiUtW
— Krushirang (@krushirang) August 15, 2022
आम्ही तुम्हाला सांगतो की ऑगस्ट-नोव्हेंबर 2021-22 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला. त्यावेळी 11 कोटी 19 लाख 25 हजार 347 शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता देण्यात आला.