PM Kisan 17th Installment : शेतकऱ्यांनो, इकडं लक्ष द्या; चुकूनही करू नका ‘या’ चुका, मिळणार नाहीत तुम्हाला पैसे

PM Kisan 17th Installment : सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक शानदार योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. यापैकीच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. लवकरच या योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पण तुम्ही काही चुका टाळणे गरजेचे आहे.

ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू केली होती आणि ही योजना केंद्र सरकार चालवत आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 2000 रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येतात. म्हणजेच प्रत्येक वर्षी एकूण 6 हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक जमा होतात.

या चुका पडतील महागात

चुकीचे बँक तपशील

जर तुम्ही चुकीचे बँक तपशील दिले तर तुम्हाला मोठा फटका बसेल. चुकीच्या बँक तपशीलामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. अशा वेळी तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहिती योग्य आहे की नाही हे एकदा तपासून पाहावे.

ई-केवायसी

अर्जदाराची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर शेतकऱ्याला लाभ मिळण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.

करा बँक खाते आधार कार्डशी लिंक

जरी अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नसल्यास पीएम किसान योजनेअंतर्गत अर्ज नाकारला जाऊ शकतो. अशा वेळी हे काम लवकर पूर्ण करा.

अर्जदाराचे वय

योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

कधी येणार PM किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचे पैसे?

PM किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचे पैसे कधी येणार याची माहिती नाही. कारण याबाबत सरकारकडून अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही परंतु शेतकऱ्यांसाठी 17 वा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल.

Leave a Comment