Thailand Plane Crash : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, थायलंडमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे ज्यामध्ये पायलटसह सर्व 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, या विमनानामधे 5 चिनी नागरिक होते. हे विमान थायलंडला जात असताना हा अपघात घडला. थायलंडमधील चाचोएंगसाओ येथे हा अपघात झाला.
थाई फ्लाइंग सर्व्हिस सेसना कारवां C208 (HH-SKR) विमानतळावरून टेकऑफ झाल्यानंतर लगेचच क्रॅश झाली, असे बँकॉक पोस्टने वृत्त दिले आहे. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. त्यानंतर मृतांच्या संख्येची पुष्टी झाली नसली तरी रात्री उशिरा शोध मोहिमेनंतर वैमानिकासह 9 जणांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
5 चिनी नागरिकांचाही मृत्यू झाला
झांग जिंगजिंग (12), झांग जिंग (43), तांग यू (42), यिन जिनफेंग (45) आणि यिन हँग (13). फ्लाइट अटेंडंट नेपाक जिरासिरी (35) आणि सिरिउपा अरुणातिड (26) अशी थाई क्रू मेंबर्सची ओळख पटली आहे. पायलट फ्लाइट लेफ्टनंट अनुचा देचापिराचॉन (61) आणि सह-वैमानिक पोर्नसाक तोताब (30) होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुवर्णभूमी कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटलेल्या विमानात 9 जण होते. हा अपघात स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.18 वाजता चाचोएंगसाओच्या बँग पाकाँग जिल्ह्यात झाला. 11 तासांच्या शोध मोहिमेनंतर विमानाचे अवशेष चिखलाच्या खारफुटीच्या जंगलात सापडले.
ज्या जंगलात मृतदेहांचे तुकडे पडले ते चिखलाने भरलेले होते.
बचाव कर्मचाऱ्यांनी पाणी काढण्यासाठी पंपांचा वापर केला आणि ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 10 मीटर खोल आणि आठ मीटर रुंद माती खणली. तपासदरम्यान अनेक मानवी शरीराचे अवयवही सापडले.
चाचोएंगसाओचे गव्हर्नर चोन्लाटी यांगट्राँग यांनी विमानातील सर्व नऊ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. गव्हर्नर चोनलती यांगट्राँग म्हणाले, “विमानातील सर्व लोक मृतावस्थेत आढळले आहेत. “अधिकारी विमान अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.”