Pistachios Side Effects : सावधान चुकूनही ‘या’ लोकांनी खाऊ नये पिस्ता; नाहीतर वाढणार आजारांचा धोका

Pistachios Side Effects : आपल्या आरोग्यासाठी पिस्ता हे खूप फायदेशीर मानला जातो यामुळे डॉक्टर देखील पिस्ता खाण्यासाठी सांगतात.

पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, व्हिटॅमिन बी6, फायबर, कॅल्शियम, लोह यांसारख्या पोषकतत्त्वे पिस्त्यात असल्याने पिस्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. मात्र तरीही काही लोकांनी पिस्ता खाणे टाळावे.  नाहीतर त्यांना विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो चला मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पिस्ता काढण्यात टाळावे.

या लोकांनी पिस्ता खाऊ नये

ऍलर्जी असणाऱ्या लोकांनी

ज्या लोकांना नट किंवा बियांची ऍलर्जी आहे त्या लोकांनी पिस्ता खाऊ नये. जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पिस्त्याचे सेवन करू नका.

किडनी रोग

पिस्त्यामध्ये ऑक्सलेट नावाचे एक घटक आढळते ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर पिस्त्याचे सेवन करू नका.

पचन समस्या

 ज्या लोकांना पचनाची समस्या आहे त्यांनी पिस्ता खाऊ नये, विशेषतः उन्हाळ्यात.  पिस्तची प्रकृती उष्ण आहे आणि यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.

 नियमित औषधे घेत असाल

जर तुम्ही नियमितपणे कोणत्याही रोगासाठी औषध घेत असाल, तर पिस्ता किंवा इतर कोणत्याही अन्नाचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण पिस्त्याचे अनेक वेळा सेवन केल्याने काही औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात.

Leave a Comment