Pick Up trucks : वीकेंडला फिरायला जायचा प्लॅन आहे? ‘या’ एसयूव्ही कार आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Pick Up trucks : जर तुमचा वीकेंडला फिरायला जायचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काही एसयूव्ही कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. याच्या किमतीदेखील खूप कमी आहेत. पहा लिस्ट.

टोयोटा Hilux

टोयोटा Hilux हे एक 4X4 MPV वाहन असून ज्यात चारही फिरत्या चाकांमध्ये उर्जा निर्माण होते, ज्यामुळे ते कच्चा रस्ते, डोंगर आणि खराब रस्त्यावर सहज प्रवास करू शकते. कारमध्ये शक्तिशाली 2.8 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. टोयोटा यात 6 स्पीड गिअरबॉक्स प्रदान करतो. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.

पाच रंग पर्याय

किमतीचा विचार केला तर Hilux चे बेस मॉडेल 35.25 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीत उपलब्ध आहे. तर सध्या, याचे दोन प्रकार आणि एलईडी हेडलाइट आणि टेललाइट आहेत. हे 201 bhp ची उच्च शक्ती आणि रस्त्यावर 420 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. कारमध्ये क्रूझ कंट्रोल आणि 8 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. हे स्वयंचलित हवामान नियंत्रण, कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि पाच रंग पर्यायांसह खरेदी करता येईल.

Isuzu V-Cross

Isuzu V-Cross मध्ये 1898 cc डिझेल इंजिन असून यात हिल स्टार्ट आणि कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. कारचे शक्तिशाली इंजिन 160.92 Bhp पॉवर आणि 360Nm टॉर्क जनरेट करते. किमतीचा विचार केला तर हे 24.78 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येत असून यात 2 व्हील आणि 4 व्हील ड्राइव्ह असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यात 6 स्पीड गिअरबॉक्स, एलईडी हँड लॅम्प आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल या फीचर्सचा समावेश केला आहे.

Leave a Comment