Physical Activity and Obesity : लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन अनेक आजारांना आमंत्रण (Physical Activity and Obesity) देणारे ठरू शकते. आजच्या धावपळीच्या युगात व्यायामासाठी वेळ काढणं अनेकांना शक्य होत नाही. ज्यामुळे शरीराचे नुकसान होत आहे. शरीराला व्यायाम नाही आणि तासनतास एकाच जागी बसून काम या कारणांमुळे वजन वाढण्याची समस्या अनेकांना जाणवत आहे. आता तर अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणाच्या तक्रारी ऐकू येऊ लागल्या आहेत. भारतात लठ्ठपणाची समस्या (Obesity Problem in India) अतिशय वेगाने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा (WHO) याची दाखल घेत गंभीर इशारा दिला आहे.
लठ्ठपणा वाढण्याची समस्या वाढण्यामागे व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही दोन मुख्य कारणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सन 1975 नंतर जगभरात लठ्ठपणा आणि वजन वाढण्याची समस्या तीन पट अधिक वाढली आहे. 2040 पर्यंत भारतात या समस्यांनी ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त होणार आहे.
Kidney health : का खराब होते किडनीचे आरोग्य? अशा प्रकारे घरच्या घरी किडनीची चाचणी
Physical Activity and Obesity
आरोग्य संघटनेने मागील 15 वर्षात 15 ते 49 वयोगटातील पुरुष आणि महिलांमधील वाढते वजन आणि लठ्ठपणाचा अभ्यास केला. या अभ्यासात असे दिसून आले की महिलांमध्ये ही समस्या 12.6 ते 24 टक्के आणि पुरुषांमध्ये 9.3 ते 22.9 टक्क्यांनी वाढली आहे. महिलांमधील लठ्ठपणात जगातील 197 देशांत भारत 182 व्या नंबरवर आहे. पुरुषांतील लठ्ठपणात भारत 180 व्या क्रमांकावर आहे. हे सगळे आकडे 2022 नुसार आहेत.
नीति आयोगाच्या ताज्या हेल्थ इंडेक्स नुसार भारतातील सर्वात हेल्दी राज्य केरळ आहे तर सर्वाधिक लठ्ठपणाची समस्या पंजाब मध्ये आहे. या राज्यात 14.2 टक्के महिला आणि 8.3 टक्के पुरुष वाढते वजन आणि लठ्ठपणाचा समस्येने हैराण आहेत.
Morning Exercise । रोज सकाळी व्यायाम करणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? जाणून घ्या
लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन या शरीरात अनेक आजारांना निमंत्रण मिळते. लठ्ठपणामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेहाचा सर्वात आधी देतो. यामुळेच अगदी कमी वेळात लोक टाईप 2 प्रकारच्या मधुमेहास बळी पडत आहेत
आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, व्यायामाचा अभाव आणि खराब खानपान यामुळे लठ्ठपणा वाढला आहे. आजकाल लोक डाळ, धान्य, फळे आणि भाजीपाला यांऐवजी प्रक्रिया केलेले आणि रिफाइंड कार्ब्सचे जास्त सेवन करतात. यामुळे लठ्ठपणात वेगाने वाढ होत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते पुरुषांच्या तुलनेत महिला व्यायाम कमी करतात. आहाराबाबतीतही महिला जास्त जागरुक नाहीत. त्याचा परिणाम म्हणून महिलांमध्ये लठ्ठपणा जास्त प्रमाणात आढळतो.