Philippines China Dispute : 11 कोटी लोकसंख्येचा देश पण, थेट चीनला भिडला; पहा, काय घडलं चीनी समुद्रात?

Philippines China Dispute : फिलीपीन्स आणि चीन यांच्यात तणाव वाढतच (Philippines China Dispute) चालला आहे. चीनच्या तटरक्षक दलाने फिलीपीन्सचे एक जहाज अडविल्याची बातमी समोर आली आहे. चीनच्या या दादागिरीमुळे फिलीपीन्सचाही (Philippines) पारा चढला आहे. जहाजाला आडकाठी केल्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांत शाब्दिक वाद झाले. दक्षिण चीन समुद्रातील (South China Sea) अधिकार क्षेत्रावरून दोन्ही देशांत वाद सुरू आहे. याआधीही अनेक वेळा दोन्ही देशात वादांचे प्रसंग उभे राहिले आहेत. परंतु, चीनच्या (China) तुलनेत लहान असला तरी फिलीपीन्सने चीनची दादागिरी सहन केलेली नाही.

फिलीपीन्सच्या तटरक्षक दलाचे प्रवक्ते कमोडोर जय टेरिएला यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जहाजांवर चीनी जहाजांनी हल्ला केला. यातील एका जहाजाला चीनी जहाजाची जोरदार धडक बसली. या धडकेत फिलीपीन्सच्या जहाजाचे मोठे नुकसान झाले. ही घटना नेमकी कुठे झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळलेला नाही. या घटनेआधी फिलीपीन्सच्या नियंत्रणाखाली आलेल्या सेकंड थॉमस शोलवर साहित्य आणि सैनिकांनी पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले होते.

China Maldives Relation : मोठी डील पक्की! चीन मालदीवला करणार ‘ही’ मदत; भारतासाठी धोक्याची घंटा

Philippines China Dispute

या घटनेनवर फिलीपीन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रात चीनकडून होत असलेल्या हल्ल्यांना सध्या तरी कोणताच पर्याय नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे स्पष्ट असूनही आमच्या प्रदेशात चीनकडून एकतर्फी आणि बेकायदेशीर कारवाई सुरू आहे. हा प्रकार म्हणजे आमच्या अधिकार आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, असे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर म्हणाले.

Philippines China Dispute

सन 2021 नुसार फिलीपीन्स या देशाची लोकसंख्या सुमारे 11 कोटी 39 लाख इतकी आहे. तर चीनची लोकसंख्य 141.24 कोटी होती. प्रत्येक क्षेत्रात चीन फिलीपीन्सच्या पुढे आहे. त्यामुळे जर दोन्ही देशांत युद्ध झाले तर फिलीपीन्सचे सैन्य काही दिवसही चीनसमोर टिकू शकणार नाही. अशी परिस्थिती असतानाही फिलीपीन्सने नेहमीच चीनचा दबाव नाकारला आहे. चीनने त्रास देण्याचा प्रयत्न केला की फिलीपीन्स सुद्धा जशास तसे उत्तर देतो. त्यामुळे या दोन्ही देशात कायमच वादाचे प्रसंग उभे राहत असतात. चीनच्या या दडपशाहीविरुद्ध जगभरातूनही टीका होत असते.

China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?

Leave a Comment