PF Rules : जाणून घ्या पीएफमधून पैसे काढण्याचा नवीन नियम, नाहीतर याल अडचणीत

PF Rules : जर तुम्ही पीएफमधून पैसे काढणार असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुमचा पीएफ दावा नाकारला जाऊ शकतो. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.

पैसे काढण्याची मर्यादा

हे लक्षात घ्या की EPF खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नसते. तुम्हाला नोकरीदरम्यान तुमच्या गरजांसाठी पीएफचा काही भाग काढता येतो. जर तुम्ही नोकरी असल्यास तर दोन महिने वाट पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पीएफची रक्कम काढता येईल आणि निवृत्तीनंतर, तुम्ही एकाच वेळी संपूर्ण रक्कम काढू शकता. यात पेन्शनचा पर्यायही उपलब्ध असेल तर तो ऐच्छिक असतो.

पीएफ क्लेम

अनेक वेळा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे पीएफ दावा नाकारण्यात येतो. PF फॉर्ममध्ये काही चुका आहेत जसे की नाव, कौटुंबिक तपशील, अपूर्ण केवायसी तपशील, चेक-पासबुकचा अस्पष्ट फोटो, चेकबुकवर नाव नसणे, बँकेचे अपूर्ण तपशील, नोकरीत रुजू होण्याच्या आणि सोडण्याच्या तारखेतील फरक, वय आणि जन्मतारीख. , यामुळे दावा EPFO ​​द्वारे नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे पीएफ फॉर्म भरताना माहिती अचूक भरावी.

समजा एखाद्या पीएफ ग्राहकाचा नोकरी किंवा निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याला त्याचे पीएफचे पैसे कसे मिळतील हे जाणून घ्यावे. पीएफ धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पीएफ रकमेचा हक्क असून यासाठी फॉर्म 20 भरावा लागू शकतो.

हा फॉर्म ईपीएफओच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करून भरल्यानंतर तो जवळच्या ईपीएफओ कार्यालयात जमा करा. इतकेच नाही तर या फॉर्मसोबत मृत्यू प्रमाणपत्र, पालक प्रमाणपत्र, नॉमिनी फॉर्म, दावेदाराचे प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील सादर करा.

Leave a Comment