Petrol Diesel Price : महागाईत दिलासा, 1 सप्टेंबरपासून पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार; जाणून घ्या नवीन दर

Petrol Diesel Price : केवळ भारतातच नाही तर शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये देखील दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने अनेकांचे बजेट बिघडत आहे. यातच पाकिस्तान सरकारने नागरिकांना मोठा दिलासा देण्याची घोषणा केली आहे.

माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक गोष्टींमध्ये बदल दिसून येतील ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर, गॅसचे दर आणि इतर अनेक बाबींचा समावेश असून त्यात सर्वसामान्यांना 1 सप्टेंबरपासून दिलासा मिळणार आहे. 1 सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 6 रुपयांनी कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर गॅसच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.

1 सप्टेंबरपासून संपूर्ण पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 6 रुपयांनी कमी होणार आहे. याशिवाय डिझेलही येथे 6 रुपयांनी स्वस्त होणार आहे.  रॉकेलबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट रोजीच सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू असून, त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

14 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करून सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता, हे विशेष. सरकारने पेट्रोलचे दर प्रतिलिटर 8.47 रुपये आणि हाय-स्पीड डिझेल (एचएसडी) 6.70 रुपयांनी कमी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्यानंतर हायस्पीड डिझेलची नवीन किंमत 272 रुपये 77 पैसे झाली आहे. तर एक लिटर पेट्रोल आता 260 ते 96 रुपये (भारतीय रुपये) झाले आहे.

पाकिस्तानमधील कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर अर्थ मंत्रालयाने नवीन किमतींबाबत आदेश जारी केले. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाल्याने पाकिस्तानी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

पाकिस्तान सरकार दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करते. कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर अर्थ मंत्रालय नवीन किमतींबाबत आदेश जारी करते. 

Leave a Comment