Petrol Price : मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून दर स्थिर आहेत. मात्र, काही छोट्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा फार फरक आहे.
दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.24 रुपयांना उपलब्ध आहे.
जयपूरमध्ये पेट्रोल 109.46 रुपये प्रति लिटर आणि एक लीटर डिझेल 94.61 रुपयांना विकले जात आहे. लखनऊमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.57 रुपये आणि डिझेलची किंमत 89.76 रुपये प्रति लीटर आहे. पाटण्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 107.59 रुपये आणि डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर आहे. नोएडामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.60 रुपये आणि डिझेलची किंमत 89.77 रुपये प्रति लीटर आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोलची किंमत 96.97 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 89.84 रुपये आहे.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 85.35 आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 78.19 आहे. अलीकडच्या काही दिवसांत मागणी कमी होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमतीत घट दिसून येत आहे.
- हे सुद्धा वाचा : Petrol Diesel Prices : तेल कंपन्यांचा पेट्रोल दराबाबत मोठा निर्णय; ‘या’ शहरांत पेट्रोल दरात वाढ
- Today Petrol Price: आज ‘इतकी’ वाढ झालीय भावात; वाचा इंधनविषयी महत्वाची माहिती