Petrol Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) घसरण होत असताना पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ किंमतीही कमी झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय या दोन्ही किमती जागतिक बाजारात नरमल्या आहेत, ज्याचा परिणाम देशांतर्गत किरकोळ बाजारावरही झाला आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या दरांनुसार दिल्ली, मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण उत्तर प्रदेशपासून बिहारपर्यंत अनेक शहरांमध्ये दर बदलले आहेत. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 32 पैशांनी 96.26 रुपये (Petrol Price) आणि डिझेल 30 पैशांनी स्वस्त होऊन 89.45 रुपये प्रति लिटर झाले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 1 पैशांनी घसरून 96.57 रुपये आणि डिझेलही 1 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय बिहारची राजधानी पाटणा (Patna) येथे पेट्रोल 17 पैशांनी घसरून 107.48 रुपये आणि डिझेल 16 पैशांनी 96.26 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
कच्च्या तेलाबद्दल सांगितले तर, गेल्या 24 तासांत त्याच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 92.27 पर्यंत घसरली आहे, तर WTI चा दर देखील प्रति बॅरल $ 85.96 पर्यंत खाली आला आहे.
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकात्यात पेट्रोल 106.3 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.
– गाझियाबादमध्ये 96.26 रुपये आणि डिझेल 89.45 रुपये प्रति लिटर झाले आहे.
– लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
– पाटण्यात पेट्रोल 107.48 रुपये आणि डिझेल 94.26 रुपये प्रति लिटर झाले आहे.
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क (Excise Duty), डीलर कमिशन, व्हॅट (VAT) आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.