Petrol Price : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Price) जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाचा दर 90 डॉलरवर येऊनही आज पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. आजही भाव स्थिर आहेत. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल (Petrol Price In India) 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मेघालय (Meghalaya) वगळता राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये सलग 126 व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही.
आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल उपलब्ध होते. श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.
श्री गंगानगरमध्ये पेट्रोल 113.49 रुपये तर डिझेल 98.24 रुपये आहे. परभणीमध्ये पेट्रोल 109.45 रुपये तर डिझेल 95.85 रुपये दराने मिळत आहे. गोरखपूरमध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये आहे. रांचीमध्ये पेट्रोल 99.84 रुपये तर डिझेल 94.65 आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये तर डिझेल 94.24 रुपये दराने मिळत आहे. बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये तर डिझेल 87.89 रुपये दराने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे. तसेच मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.