Pakistan : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता भीषण पुरामुळे हैराण केले आहे. त्यात पाकिस्तानात अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. आता पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात (Petrol Price) वाढ करण्यात आली असून, त्यामुळे येथे पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर 235 रुपयांचा टप्पा पार केला आहे.
तथापि, भारतात विकल्या जाणार्या सर्वात स्वस्त पेट्रोलपेक्षा ते अजूनही थोडे महाग आहे. भारतीय रुपयात 235.98 पाकिस्तानी रुपयाची किंमत 86.51 रुपये आहे. तर पोर्ट ब्लेअरमध्ये आज एक लिटर पेट्रोलची किंमत 84.10 रुपये आहे. भारतात पेट्रोलची (petrol) सरासरी किंमत 100 रुपये प्रति लिटर आहे. त्यानुसार दिल्लीत (Delhi) पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटरने विकले जात असलेल्या पेट्रोलपेक्षा पाकिस्तानमध्ये (Pakistan) पेट्रोल स्वस्त आहे.
पाकिस्तानच्या वेबसाइट डॉननुसार, पेट्रोलच्या दरात 2.07 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर हायस्पीड डिझेलही (Diesel) प्रतिलिटर 2.99 रुपयांनी वाढले आहे. तर रॉकेल (Kerosene) 10.92 रुपयांनी तर लाईट डिझेल 9.79 रुपयांनी वाढले आहे. पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, “पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींच्या पाक्षिक आढावा (15 दिवस) मध्ये, सरकारने आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती आणि विनिमय दरातील चढ उतारांच्या अनुषंगाने पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती अंशतः वाढविण्याच्या शिफारशीचा विचार केला आहे.” ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आकारणी कमीत कमी ठेवण्यात आली आहे.”
1 ते 15 सप्टेंबर या कालावधीसाठी नवीन किमती जारी केल्या आहेत. त्यानुसार पेट्रोल 235.98 रुपये, एचएसडी 247.43 रुपये, रॉकेल 210.32 रुपये आणि एलडीओ 201.54 रुपये प्रतिलिटर झाले आहे. सध्या, पाकिस्तानमध्ये 17 टक्के सामान्य कर दराच्या तुलनेत सर्व चार इंधन उत्पादनांवर GST शून्य आहे. मात्र, सरकार सध्या विविध उत्पादनांवर 15 ते 25 रुपये प्रति लिटर पीडीएल आकारत आहे. ते पेट्रोल आणि एचएसडीवर प्रति लिटर सुमारे 20 रुपये कस्टम ड्युटी देखील घेत आहे. पाकिस्तानमध्ये एक किलो कांद्याचा भाव 500 रुपयांवर पोहोचला होता, तर उर्वरित भाज्यांची अवस्था अजूनही तशीच आहे. यानंतर पाकिस्तानकडून भारतातून टोमॅटो आणि कांदा आयात करण्याच्या चर्चा सुरू होत्या.