Petrol Diesel Prices Today : मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Prices Today) कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रविवारी ब्रेंट क्रूड प्रति (Crude Oil Price) बॅरल $95.77 वर होता. यूएस क्रूड 0.79 टक्क्यांनी घसरून 88.38 डॉलर प्रति बॅरल होता. देशांतर्गत तेलाची विक्री करणाऱ्या भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) या कंपनीच्या म्हणण्यानुसार, आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल (Petrol Price In Delhi) 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. चार महिन्यांहून अधिक काळ देशात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर (Petrol Price In Mumbai) 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी होतील असे वाटत होते. मात्र, तेल कंपन्यांनी अद्याप याचा फायदा लोकांना दिलेला नाही. किंमती स्थिर ठेवल्या आहेत. कमी करणे अपेक्षित होते मात्र तसा निर्णय घेतला गेलेला नाही. कंपन्यांनी इंधनाच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत. यामुळेही कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचा विचार केल्याचे दिसत नाही. आजही पेट्रोल शंभरच्या पुढे आहे. त्यामुळे इंधनावर पैसे खर्च करणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. मात्र, आवश्यक असल्याने दुसरा पर्यायही लोकांकडे नाही . सरकारने मात्र या गोष्टींचा अजूनही विचार केल्याचे दिसत नाही. उलट अन्य देशांच्या तुलनेत भारतातील इंधन दरवाढ (Fuel Rate In India) फार नसल्याचे सरकारचे मंत्री सांगत आहेत.
- हे वाचा : Petrol Diesel Prices Today : दिवाळीतही मिळाला दिलासा..! पहा, आज काय आहेत पेट्रोलचे भाव ?
- Petrol Diesel Prices : तेल कंपन्यांचा पेट्रोल दराबाबत मोठा निर्णय; ‘या’ शहरांत पेट्रोल दरात वाढ
- Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; 5 महिन्यांनंतरही कंपन्यांचा ‘तो’ निर्णय कायम