मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड 87.62 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय 80.08 डॉलर प्रति बॅरल दराने विकले जात आहे. इथे सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या दरात किरकोळ बदल करण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये पेट्रोल 0.48 रुपयांनी वाढून 108.68 रुपये तर डिझेल 0.43 रुपयांनी वाढून 93.90 रुपयांवर पोहोचले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 0.44 रुपयांनी वाढून 107.26 रुपये आणि डिझेल 0.41 रुपयांनी वाढून 93.90 रुपये झाले आहे. हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्येही पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर तसेच चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. नोएडामध्ये पेट्रोल 97 रुपये आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोल 96.44 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रति लिटर झाले आहे. पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.
- Read : Petrol Diesel Prices Today : दिवाळीतही मिळाला दिलासा..! पहा, आज काय आहेत पेट्रोलचे भाव ?
- Petrol Diesel Prices : तेल कंपन्यांचा पेट्रोल दराबाबत मोठा निर्णय; ‘या’ शहरांत पेट्रोल दरात वाढ