Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) घसरण होत असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले आहेत. 150 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कच्चे तेल प्रति बॅरल $92 च्या खाली आले आहे. ब्रेंटpetro क्रूड प्रति बॅरल $ 91.87 वर व्यापार करत होते तर WTI प्रति बॅरल $ 85.70 वर व्यापार करत होते.
पेट्रोलचे दर त्याच पातळीवर कायम आहेत. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात शेवटचा बदल 22 मे 2022 रोजी झाला होता. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करून महागड्या तेलापासून दिलासा दिला. देशभरात पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले. यानंतर काही राज्यांनी व्हॅटमध्ये (VAT) कपात करून ग्राहकांना आणखी दिलासा दिला होता.
देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 109.45 रुपये तर डिझेल 95.85 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये, दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये आहे. तसेच मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे.
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी होतील असे वाटत होते. मात्र, तेल कंपन्यांनी अद्याप याचा फायदा लोकांना दिलेला नाही. किंमती स्थिर ठेवल्या आहेत. कमी करणे अपेक्षित होते मात्र तसा निर्णय घेतला गेलेला नाही.
- Must Read : Business News : आयएमएफने का दिला परकीय चलन साठा वाचवण्याचा सल्ला : वाचा सविस्तर
- Petrol Price : कच्चे तेल स्वस्त..! देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल दराबाबत घेतला ‘हा’ निर्णय; वाचा महत्वाची माहिती
- Today Petrol Price: आज ‘इतकी’ वाढ झालीय भावात; वाचा इंधनविषयी महत्वाची माहिती
- Petrol Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर