Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या (crude oil) किंमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी, ब्रेंट क्रूडची (Brent crude) किंमत प्रति बॅरल ९४.४० डॉलर इतकी झाली आहे, तर WTI प्रति बॅरल ८८.८७ डॉलरवर पोहोचले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज काही राज्यांमध्ये किंमतीत वाढ झाली आहे. तर चांगली गोष्ट म्हणजे दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), चेन्नई Chennai) आणि कोलकाता (Kolkata) या चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.
https://www.goodreturns.in/petrol-price.html
आज बिहारमध्ये (Bihar) पेट्रोल (Petrol) पुन्हा ५१ पैशांनी वाढून १०९.६६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ४८ पैशांनी वाढून ९६.२८ रुपये प्रति लिटर झाले आहे. त्याच वेळी, पंजाबमध्ये (Punjab) पेट्रोल २१ पैशांनी वाढून ९६.८९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) २१ पैशांनी वाढून ८७.२४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
– कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये. डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
- Must Read:
- Petrol Price : शनिवारी मिळाला मोठा दिलासा.. पेट्रोलच्या किंमतीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
- Business News : ही कंपनी २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
- Rain : पावसाचा धुमाकूळ सुरुच.. प्रशासनाने नाईलाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या..
घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर
तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि ९२२२२०११२२ या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.