Petrol : तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 मे पासून ते स्थिर आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचा (Petrol) दर 96.72 रुपये प्रतिलिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. दिल्लीत एक लिटर डिझेलची (Diesel) किंमत 89.62 रुपये, मुंबईत 94.28 रुपये, कोलकात्यात 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता, जेव्हा अर्थमंत्र्यांनी उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याची घोषणा केली होती. 21 मे रोजी पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कपातीची घोषणा करण्यात आली होती. या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोल 8.69 रुपयांनी तर डिझेल 7.05 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
राजधानी दिल्लीत सध्या 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे. यामध्ये मूळ किंमत 57.13 रुपये आहे. भाडे 20 पैसे प्रति लिटर आहे. उत्पादन शुल्क 19.90 रुपये आणि व्हॅट (VAT) 15.71 रुपये प्रति लिटर आहे. डीलर कमिशन 3.78 रुपये प्रति लिटर आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, हा कराचा दर 15 जून 2022 च्या आधारावर आहे.
दुसरीकडे राजधानी दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. याची आधारभूत किंमत 57.92 रुपये प्रति लिटर आहे. प्रति लिटर भाडे 0.22 रुपये, उत्पादन शुल्क 15.80 रुपये आणि व्हॅट 13.11 रुपये प्रति लिटर आहे. डीलरचे कमिशन 2.57 रुपये प्रति लिटर आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमती भडकल्या आहेत. तथापि, युद्धानंतरच्या तीन महिन्यांत भारताने (India) रशियाकडून $5.1 अब्ज किमतीचे पेट्रोलियम आयात केले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते आधीपेक्षा 3 पटीने जास्त आहे.