नवी दिल्ली : सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत $1.78 किंवा 2.08 टक्क्यांनी वाढून $87.35 वर पोहोचली आहे, तर WTI क्रूडची किंमत $1.65 किंवा 2.06 टक्क्यांनी वाढून $81.63 वर पोहोचली आहे. अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम भारतात दिसला नाही. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर तेल कंपन्यांनी जाहीर केले आहेत. दरात कोणताही बदल झालेला नाही आणि प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, काही शहरांमध्ये वाहतूक आणि इतर कारणांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल करण्यात आला आहे.
मोठ्या महानगरांबद्दल सांगतिले तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 89.62 रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
गुरुग्राममध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.85 रुपये आणि डिझेलची किंमत 89.73 रुपये प्रति लीटर आहे. नोएडामध्ये पेट्रोलची किंमत 96.58 रुपये आणि डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रति लीटर आहे. लखनौमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.57 रुपये आणि डिझेलची किंमत 89.76 रुपये प्रति लीटर आहे. पाटण्यात पेट्रोलची किंमत 107.24 रुपये आणि डिझेलची किंमत 94.04 रुपये प्रति लीटर आहे. जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत 108.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 93.38 रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले जातात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर, मालवाहतूक खर्च आणि डीलर कमिशन यांचा समावेश आहे.
- Must Read : महिन्याच्या सुरुवातीला ‘या’ शहरांत बदललेत पेट्रोलचे भाव; चेक करा काय आहेत नवीन भाव ?
- शनिवारीही दिलासा कायम..! जाणून घ्या, काय आहे तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव ?