मुंबई – तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे (Petrol Diesel New Price) दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या आठवड्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली आहे. आज राजधानी दिल्लीत (Delhi) एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात (Kolkata) पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही (Chennai) पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क (Excise Duty), डीलर कमिशन (Dealer Commission) आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. या निकषांच्या आधारे पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर दररोज ठरवण्याचे काम तेल कंपन्या करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. कर आणि स्वतःचे मार्जिन जोडून ते ग्राहकांना किरकोळ किमतीत पेट्रोल विकतात. हा खर्च पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही जोडला जातो.
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या सरासरी दराची तुलना भाजप आणि एनडीए सरकार (NDA Government) नसलेल्या सरकारांशी केली, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर सुमारे 5 रुपयांचा फरक आहे. म्हणजेच ज्या राज्यांमध्ये भाजप किंवा एनडीएचे सरकार आहे, तेथे काँग्रेस किंवा बिगर एनडीए सरकार असलेल्या राज्यांच्या तुलनेत पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर स्वस्त आहे. डिझेलच्या बाबतीतही तेच आहे. डिझेलच्या दरातही सुमारे 6 रुपयांची तफावत आहे.
तरीही, काही बिगर-भाजप सरकार राज्यांमध्ये व्हॅट (VAT) कमी न केल्यामुळे पेट्रोल 100 च्या पुढे आहे. मणिपूर, मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटक वगळता ज्या राज्यांमध्ये भाजप किंवा एनडीएचे सरकार आहे, तेथे पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आहे. तर, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड यांसारख्या NDA सरकार नसलेल्या राज्यांमध्ये पेट्रोलची (Petrol Price) किंमत सुमारे 111 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल-डिझेलच नवे दर जाहीर.. पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या, काय आहे इंधनाचे भाव..