मुंबई : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी दिल्ली आणि चेन्नईमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत. सरकारने काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत.
आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत.
दिल्लीत डिझेल 89.62 रुपये तर पेट्रोल 96.72 रुपये, मुंबईत डिझेल 94.27 रुपये तर पेट्रोल 106.31 रुपये, कोलकाता शहरात डिझेल 92.76 रुपये तर पेट्रोल 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये डिझेल 94.24 रुपये तर पेट्रोल 102.63 रुपये या दराने मिळत आहे.
सध्या इंधनाचे जे दर आहेत ते सुद्धा खूप जास्त आहेत. एप्रिल महिन्यानंतर इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून दर स्थिर असले तरी याआधीच सरकारने दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. इंधनावरील कर, पुरवठादाराचे कमिशन मिळून इंधनाचे दर जास्त वाढतात. याचा फटका नागरिकांना बसत आहे. या गोष्टींचा विचार करून दर कमी होणे गरजेचे आहे. मात्र, सरकारला याद्वारे हजारो कोटी रुपये महसूल मिळत असल्याने त्यावर निर्णय घेतला जात नाही.
- Must Read : कच्च्या तेलाचे भाव घसरले..! तेल कंपन्यांनी पेट्रोलबाबत घेतला ‘हा’ निर्णय; चेक करा आजचे भाव
- पेट्रोल जीएसटीत येणार का ? ; पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले ‘हे’ उत्तर; वाचा, तुमच्यासाठी महत्वाची माहिती..