Petrol and diesel price; सरकारी तेल कंपन्यांनी आज (18 जून) सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol And Diesel Price) जाहीर केले आहेत. आज सलग 29व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे. आता केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
केंद्र सरकारने सर्व रिटेल आउटलेटसाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्गम भागासाठीही त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही सरकारने आपल्या निर्णयात म्हटले आहे. आत्तापर्यंत ही प्रक्रिया फक्त ईशान्येत लागू होती पण ती वाढवून देशाच्या इतर भागातही लागू केली जाईल.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
तुमच्या शहराची नवीनतम किंमत काय आहे?
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.20 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर