मुंबई – पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून केंद्र सरकारने दिलेल्या सवलतीचा सर्वसामान्यांना फायदा झाला. परंतु बहुतांश राज्यांनी कोणतीही सूट दिली नाही. गेल्या वेळी केंद्र सरकारने दिवाळीआधी अबकारी करात कपात केली होती, तेव्हा अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये (VAT) मोठी कपात केली होती. मात्र यावेळी तसे झाले नाही. सध्या भाजप किंवा भाजप समर्थित राज्ये आणि बिगरभाजप सरकारे असलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच जिथे आप, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सरकार आहे तिथे पेट्रोल-डिझेल तुलनेने महाग (Fuel Costly In Non BJP Ruled State) आहे.

तरीही, काही बिगर-भाजप सरकार राज्यांमध्ये व्हॅट कमी न केल्यामुळे पेट्रोल 100 च्या पुढे आहे. मणिपूर, मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटक वगळता ज्या राज्यांमध्ये भाजप किंवा एनडीएचे सरकार आहे, तेथे पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आहे. तर, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड यांसारख्या NDA सरकार नसलेल्या राज्यांमध्ये पेट्रोलची (Petrol Price) किंमत सुमारे 111 रुपये प्रति लिटर आहे. झारखंड, दिल्ली आणि पंजाबमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल 96.57 रुपये तर डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे. उत्तराखंडमध्ये पेट्रोल 95.22 रुपये, डिझेल 90.26 रुपये, गोवा पेट्रोल 97.68 रुपये, डिझेल 90.23 रुपये, मणिपूरमध्ये पेट्रोल 101.18 रुपये तर डिझेल 87.13 रुपये, त्रिपुरामध्ये पेट्रोल 99.49 रुपये तर पेट्रोस 88.44 रुपये, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल108.65 रुपये, डिझेल 93.9 रुपये, बिहारमध्ये पेट्रोल 107.24 रुपये, डिझेल 94.04 रुपये आहे.

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या सरासरी दराची तुलना भाजप आणि एनडीए सरकार नसलेल्या सरकारांशी केली, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर सुमारे 5 रुपयांचा फरक आहे. म्हणजेच ज्या राज्यांमध्ये भाजप किंवा एनडीएचे सरकार आहे, तेथे काँग्रेस किंवा बिगर एनडीए सरकार असलेल्या राज्यांच्या तुलनेत पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर स्वस्त आहे. डिझेलच्या बाबतीतही तेच आहे. डिझेलच्या दरातही सुमारे 6 रुपयांची तफावत आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये आहे. झारखंडमध्ये पेट्रोल 99.84 रुपये तर डिझेल 94.65 रुपये, छत्तीसगडमध्ये पेट्रोल 102.45 रुपये, डिझेल 95.44 रुपये, तमिळनाडूमध्ये पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.26 रुपये, केरळमध्ये पेट्रोल 107.71 रुपये तर डिझेल 96.52 रुपये, पंजाबमध्ये पेट्रोल 96.2 रुपये तर पेट्रोल 84.26 रुपये, तेलंगानामध्ये पेट्रोल 109.66 रुपये तर डिझेल 97.82, महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 111.35 रुपये तर डिझेल 97.28 रुपये, राजस्थानमध्ये पेट्रोल 108.48 रुपये तर डिझेल 93.72 रुपये, आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोल 109.66 रुपये तर डिझेल 97.82 रुपयांना मिळत आहे.

याआधी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत मोदी सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) अनुक्रमे 8 रुपये आणि 7 रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली होती. जेणेकरून पेट्रोलच्या किंमती आणि डिझेल कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारने दिलासा दिल्यानंतर महाराष्ट्र, राजस्थान आणि केरळने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये (Reduce In Vat) कपात केली आहे. महाराष्ट्राने पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपयांनी आणि डिझेलवर 1.44 रुपये, राजस्थानने पेट्रोलवर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपये कर कमी केला आहे. तर केरळने पेट्रोलवर 2.41 रुपये आणि डिझेलवर 1.36 रुपयांची कपात केली आहे.

Petrol Car : ‘या’ आहेत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार; जाणून घ्या, काय आहेत फिचर..

तेल कंपन्यांनी जारी केले नवे दर.. पहा, तुमच्या शहरात पेट्रोलचे दर वाढले की घटले..

Share.

Leave A Reply

Exit mobile version